pancard aadhar link website :- नमस्कार मित्रानो माझे नाव ओमकार मी आज तुम्हाला या पोस्ट मध्ये आधार कार्ड सोबत pancard कसे लिंक करायचे ? आणि ते लिंक केल्यानंतर कुठलेफायदे होतात आणि आणि जर लिंक नाही केले तर काय तोटे होतात याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत . ज्यामध्ये मी तुम्हाला सांगेल कि pancard म्हणजे काय , त्याचा वापर कुठे कुठे केला जातो आणि ते लिंक कसे करावे तेही स्टेप बाय स्टेप माहिती मी तुम्हाला देणार आहे .
चला तर मग पाहूयात माहिती
✅ 1) PAN कार्ड म्हणजे काय?
आज काल आपण दैनंदीन जीवनात PAN कार्ड हा शब्द खूप जनानाच्या तोंडून ऐकत असतो , पण बर्याच जणांना माहिती नाही कि pancard म्हणजे काय ,
तर पण कार्ड म्हणजे Permanent Account Number हा एक आसा number आहे जो प्रत्येक व्यक्तीला भारताच्या आयकर विभागाकडून दिला जातो आणि तो ऐकून १० अंकांचा असतो , आणि तो अल्फान्यूमेरिक असतो .
तसेच pancard ला आपण आर्थिक ओळखपत्र (Financial Identity) म्हणुनही या नावानेही ओळखतो.
उदाहरणार्र्थ :- ABCDE1234F
आता आपण याचा उपयोग कुठे कुठे केला जातो याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात,
सर्वात महत्वाचा उपयोग म्हणजे याचा वापर आपण आयकर रिटर्न (ITR) भरताना जे लोक सरकारी व खाजगी नोकरदार वर्ग आहेत त्यासाठी उपयोग केला जातो .
त्याच बरोबर जर तुमचे एखाद्या बँकेत खाते असेल किवा नवीन खाते उघडायचे आहे त्यासाठी याचा उपयोग केला जातो
जर आपल्याला बँकेत 50 हजार पेक्षा जास्त पुढचे व्यवहार करायचे असतील तर आपल्याला pancard चा उपयोग होतो.
त्याच बरोबर जे लोक शेअर मार्केट, म्युच्युअल फंड यासारख्या गोस्ठीमध्ये पैशाची गुंतवणूक करतात त्या लोकांना याचा उपयोग होतो
तसेच जर आपल्याला कुठली एकादी मालमत्ता खरेदी अथवा विक्री करायची असेल तर आपल्याला pancard चा उपयोग करावा लागतो .
आधार कार्ड म्हणजे काय याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात
जसे कि वर आपण pancard बद्दल माहिती जाणून घेतली आता आपण आधार कार्ड बद्दल माहिती जाणून घेऊ.
Aadhaar कार्ड हे एक आपले UIDAI यांच्याकडून जरी केल्लेले असे ओळखपत्र आहे जे प्रत्येक व्यक्तीची सर्व माहिती online पद्धतीने जतन करून ठेवली जाते त्याच बरोबर प्रत्येक व्यक्तीला एक विशिष्ट ओळख number दिला जातो त्याला आपण आधार number या नावानेही ओळखतो .
हा ओळख number म्हणजे Unique Identity Number (UID) जो कि १२ अंकी असतो त्या number मध्ये प्रतेक व्यक्तीचे बायोमेट्रिक माहिती ज्यामध्ये ( फिंगरप्रिंट + डोळ्यांचे स्कॅन) आणि डेमोग्राफिक माहिती जतन करून ठेवलेली असते जिला आपण डिजिटल माहिती असेही म्हणतो .
आजकाल सर्व ठिकाणी आधार कार्ड लागते ज्यामध्ये तुम्ही आधार कार्ड चा वापर पुढील ठिकाणी करता
आधार कार्ड चा उपयोग आपण सुरवातीला पत्ता आणि ओळखीचा पुरावा यासाठी केला जातो .
त्याच्बोबर सरकारच्या जेवढ्य पण योजना असतील तसेच सरकार च्या सब्सिडी चा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड चा वापर केला जातो.
त्याचबरोबर याचा वापर आपण आपल्या mobile साठी सीम कार्ड घेण्यसाठी हि करतो
तसेच प्रत्येक बँक / gas /lpg/ आणि मतदान नोंदणी करण्यसाठी याचा वापर केला जातो.
त्याच बरोबर सर्व ठिकाणी आधार कार्ड हे आपल्या ओळखीचा पुरावा म्हणूनही ओळखला जातो / त्याचा वापर केला जातो.
आता आपण आधार कार्ड PAN सोबत लिंक करणे म्हणजे काय याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात,
आधार कार्ड pancard सोबत लिंक करणे म्हणजे काय करणे ?
आधार आणि pan लिंकिंग म्हणजे दोन्ही एक मेकांना लिंक करणे जसे कि तुमचा जो pan card चा number असतो to आधार कार्ड सोबत लिंक होतो म्हणजे तुमची आधार कार्ड आणि pancard ची सर्व माहिती एकमेकासोबत लिंक केली जाते तिला आपण आधार आणि pancard लिंकिंग असे म्हणतो
जसे कि तुम्हाला सर्वाना माहिती असेलच केंद्र सरकारने आता pancard सोबत आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे , तर आपल्यालाही हे जोडून घ्यावे लागेल.
आता आपल्याला प्रश्न पडला असेलच कि जर आपण हे एकमेकासोबत लिंक केले तर काय फायदा होतो ? किवा का आवश्यक आहे याबद्दल माहिती पाहूयात.
तसे पहिले तर याचा फायदा आपल्य्साठी काहीच नाही कारण पुढील जेवढे पण फायदे आहेत ते सर्व सरकार साठी आहेत .
ज्यामध्ये जर एखादा व्यक्ती दोन pancard वापरात असेल तर त्याची माहिती सरकार ला लगेच मिलेते आणि आपल्या सर्वाना माहिती आहेच दोन pancard वापरणे कायद्याने गुन्हा आहे . जर एकदा व्यक्ती दोन pancard वापरात असेल तर सरकार a लगेच त्याची माहिती मिळेल.
तसेच जे पण सरकारचे कर विभाग आहे त्यांना कुठला व्यक्ती किती कर भरतो आणि कधी भरतो याबद्दल सर्व माहिती ठेवण्यास सोपे जाते.
त्याच बरोबर एकदा व्यक्ती किती आर्थिक व्यवहार करतो याची अचूक माहिती सरकार ला या मुळे मिळते / घेता येते .
आता आपण हे लिंक कसे करावे याबद्दल माहिती पाहूयात
pancard सोबत आधार कार्ड लिंक कसे करावे?
- तुम्ही pancard सोबत आधार कार्ड ३ प्रकारे करू शकता
- सर्वात पहिली पद्धत म्हणजे तुम्ही sms सुविधे द्वारे लिंक करू शकता.
- दुसरी पद्धत म्हणजे online पद्धतीने लिंक करू शकता
- आणि तिसरी पद्धत म्हणजे तुम्ही direct ऑफिस ला जाऊन पण लीन्किग करू शकता.
- आता आपण sms द्वारे लिंक कसे करावे याबद्दल माहिती घेयुयात
SMS द्वारे आधार कार्ड pancard सोबत कसे लिंक करावे
जर तुम्हाला sms द्वारे लिक करायचे असेल तर तुम्हाला तुमचा mobile number आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे
तुमच्या register mobile number number वरून UIDPAN <आधार क्रमांक> <PAN क्रमांक> आणि to टाकून sms तुम्हाला 567678 किंवा 56161 वर पाठवायचा आहे.
हे केल्नंयातर तुमच्या mobile वर तुमचे pancard लिंक झालेला sms प्राप्त होईल
ऑनलाइन पद्धतीने आधार pancard सोबत कसे लिंक करावे?
- सर्वात सोपी आणि सर्वात जास्त वापरली जाणारी पद्धत म्हणजे online पद्धत
- या मध्ये तुम्हाला पुढील स्टेप बाय स्टेप वापरून लिंक करता येईल
- सर्वात आगोदर तुम्हाला Income Tax च्या official वेबसाईट वर तुम्हाला जाईचे आहे
आधार pancard लिंकिंग वेबसाईट:- https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar
- वरील वेबसाईट चा वापर करून तुम्ही आधार कार्ड तुमच्या pancard सोबत लिंक करू शकता.
- त्यसाठी तुम्हाला तुमचा आधार number टाकायचा आहे.
- आणि तुमचा pancard number टाका
- तुमचा mobile number टाका
- तुमच्या mobile वर एक otp येईल
- to otp टाका
- otp टाकल्या नन्तर हि प्रोसेस पूर्ण होईल.
- तसेच तुम्ही तुम्ही तुमच्या आधार कार्ड चे pancard चे लिंकिंग स्टेट्स पण पाहू शकता तो पुढील प्रमणे
आधार कार्ड pancard सोबत लिंक स्टेट्स कसे पाहावे?
pancard and aadhar card link status website :- https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/link-aadhaar-status
- तुमचा pancard number टाका
- तुमचा आधार card number टाका
- आणि खालील view या button चा उपयोग करून तुम्ही स्टेट्स पाहू शकता.
अशी होती हि माहिती ,
आशा आहे हि माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल . जर तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला comment करून माहिती विचारू शकता.