How To Create Driving License Online | आता घरी बसल्या बनवा ड्रायविंग लायसन्स | पहा संपूर्ण online प्रोसेस

How To Create Driving License Online  :- नमस्कार मित्रानो मी आज आपण एका नवीन विषयावर माहिती घेणार आहोत ती आपल्या दैनदिन वापरामध्ये आपण त्याचा उपयोग करतो ती म्हणजे ड्रायविंग लायसन्स म्हणजे काय , ते काढण्यासाठी कुठकुठली कागदपत्र लागतात , तसेच ते कसे काढावे , टेस्ट कुठली द्यायची आणि टेस्ट मध्ये कुठले कुठले प्रश्न विचारले जातात , या बद्दल सविस्तर माहिती आपण पाहूयात.

Social Buttons

सर्वात आगोदर आपण 🚗 ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे काय याबद्दल माहिती घेऊयात.

ड्रायविंग लायसन्स म्हणजे आपल्याला सरकार कडून गाडी चाल्वण्य्साठी सरकार कडून मिळालेली कायदेशीर परवानगी म्हणजे ड्रायविंग लायसन्स होय ज्यामुळे आपल्याला कुठलेही दंड भरण्याची आवश्यकता नाही .

जर तुमच्याकडे ड्रायविंग लायसन्स असेल तर तुम्ही सर्व सार्वजनिक रस्त्यावर  कायदेशीर पद्तीने गाडी चालवू शकता.

आता आपण ड्रायविंग लायसन्स चे असणारे कुठले कुठले फायदे आहेत याबद्दल माहिती घेयुयात

ड्रायव्हिंग लायसन्सचे फायदे पुढील प्रमाणे

कायदेशीर परवानगी मिळते

जर आपल्याकडे ड्रायविंग लायसन्स असेल तर तर कायद्याने आपल्याला गाडी चाल्वण्य्साठी परवानगी मिळते .

ओळखपत्र म्हणून कायदेशीर मान्यता

ड्रायविंग लायसन्स  हे आपल्याला आपले ओळखपत्र म्हणून वापरते आणि त्याला कायदेशीर मान्यता आहे त्यामुळे तुम्ही ओळखपत्र म्हणूनही याचा उपयोग करू शकता.

प्रवास करण्यसाठी खूप महत्वाचे

जर तुमच्याकडे ड्रायविंग लायसन्स असेल तर तुम्ही स्वतः साठी (Self-drive car/bike) भाड्याने गाडी घेऊ शकता  त्यासाठी तुम्हाला ड्रायविंग लायसन्स आवश्यक आहे.

कायदेशीर नियमाचे पालन करतो म्हणून पुरावा

जर तुमच्याकडे ड्रायविंग लायसन्स असेल तर तुम्ही सर्व कायदेशीर नियमाचे पालन करता आणि तुम्ही ड्रायविंग लायसन्स टेस्ट पास झालेले आहे हा तो पुरावा म्हणून समजला जातो.

कुठेही रोजगारची संधी मिळते.

जर तुम्हाला ड्रायविंग च्या क्षेत्रामध्ये नोकरी करायची असेल तर तुम्हाला तुमच्या जवळ Commercial Driving Licence असेल तर तुम्हाला पुढील ठिकाणी नोकरी करता येते ,

तुम्ही ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर म्हणून कुठेही नोकरी करू शकता

तसेच कुठल्याही डिलिव्हरी व्हॅन ड्रायव्हर वर ड्रायव्हर  म्हणून तुम्हाला नोकरी मिळू शकते

त्याचबरोबर तुम्ही  ऑटो/टॅक्सी ड्रायव्हर म्हणूनही नोकरी करू शकता

किवा बस/ट्रक ड्रायव्हर म्हणूनही नोकरी करू शकता.

अशे याचे फायदे आहेत.

आता आपण नवीन ड्रायविंग लायसन्स साठी कुठली कुठली कागदपत्र लागतात याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात.

📑 नवीन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी कुठली कुठली कागदपत्र लागतात?

सर्वात आगोदर तुम्हाला Learner Licence (LL) काढून घ्यावे लागते

त्यसाठी तुम्हाला पुढील कागदपत्र लागतात

लर्निंग लायसन्स (LL) साठी  कुठली कुठली  कागदपत्रे लागतात?
सुरवातीला तुम्ही ओळखपत्र म्हणून पुढील कुठलेही एक कागदपत्र जोडून देऊ शकता.

अर्जदाराचे स्वतःचे आधार कार्ड

अर्जदाराचे स्वतःचे pancard

पासपोर्ट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याचा उपयोग ओळखीचा पुरावा म्हणूनही वापर करू शकता.

सर्वात शेवटचे आणि महत्वाचे कागदपत्र म्हणजे मतदान ओळखपत्र ते तुम्ही ओळखपत्राचा पुरावा म्हणूही वापरू शकता.

दुसरा महत्वाचा पुरावा म्हणजे तुम्ही राहत असलेला ठिकाणचा पत्याचा पुरावा

पत्याच्या पुरावा या मध्ये तुम्ही पुढील पैकी कुठलेही एक कागदपत्र जोडून देऊ शकता

ज्यामध्ये तुम्ही अर्जदाराचे आधार कार्ड किवा राशन कार्ड किवा पाण्याचे बिल यापैकी कुठलेही एक कागदपत्र पत्याचा पुरावा म्हणून देणे आवश्यक आहे.

त्याच बरोबर जर तुमच्याकडे तुमच्या बँकेचे स्टेटमेंट असेल तेही तुम्ही पत्याचा पुरावा म्हणून देऊ शकता.

तुम्हाला तुमचा स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो जोडून द्यावा लागेल.

जर तुमचे वय 50 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला वैद्यकीय सर्टिफिकेट द्यावे लागेल

सर्व कागदपत्र दाखल केल्या नंतर तुमची एक परीक्षा होईल ती परीक्षा पास झाल्या नंतर तुम्ही पर्मनंट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करू शकता.

पर्मनंट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करण्यसाठी लागणारी कागदपत्र

सर्वात आगोदर तुम्ही ती परीक्षा पास होणे गरजेचे आहे (लर्निंग लायसन्स (LL))

त्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा फोटो

कुठल्याही एका ड्रायविंग school चे प्रमाणपत्र द्यावे लागेल

जो तुम्ही online अर्ज भरला होता त्याची एक प्रिंट out (RTO ऑनलाइन फॉर्म) जोडून देणे आवश्यक आहे.

वयानुसार तुम्हाला मेडीकल प्रमाणपत्र जोडून द्यावे लागेल

आता तुम्हाला मी लर्निंग लायसन्स साठी अर्ज कसा करावा ते Step-by-Step सांगतो

📝 नवीन ड्रायव्हिंग लायसन्स कसे काढावे?

सर्वात पहिली पायरी: लर्निंग लायसन्स (LL) काढणे

हे काढण्यसाठी तुम्हाला online अर्ज करावा लागेल

online अर्ज करण्यसाठी वेबसाईट sarathi.parivahan.gov.in

तिकडे तुम्हाला “Learner Licence” साठी अर्ज करा हा पर्याय दिसत असेल तिकडे क्लिक करा

एक फॉर्म open होईल to संपूर्ण form  भरा

ज्यामध्ये तुम्हाला तुमचे संपूर्ण माहिती तसेच कुठले वाहनासाठी लायसन्स हवे आहे ती माहिती अचूक भरा

लागणारी सर्व कागदपत्र अपलोड करा

तुम्हाला online फी साठी विचारले जाईल online फी भरून टाका

फी भरल्यानंतर तुम्हाला स्लॉट बुकिंग म्हणजेच तुम्म्हला कुठल्या तारखेला टेस्ट द्याची आहे ती तारिक निवडायची आहे

ती तारीख निवाद्ल्यानातर तुम्ही त्या तारखेला जाऊन ऑनलाइन संगणक परीक्षा द्या

ती परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला पास झालेल्या तारखेपासून तुम्हला ६ महिन्याकरिता लर्निंग लायसन्स (LL)  मिळते.

आता लर्निंग लायसन्स काढल्यानंतर तुम्हाला ३० दिवसानंतर तुम्ही Permanent Driving Licence अर्ज करू शकता

ते कसे करायचे ते सांगतो

Permanent Driving Licence (DL) कसे काढावे

जी वर वेबसाईट दिली आहे ती open करून Driving Licence → Apply for DL  हे पर्याय निवडून घ्या

to सर्व form भरून घ्या

लागणारी सर्व कागदपत्र online पद्धतीने उपलोड करा

लागणारी सर्व फी भरून घ्या

त्यानंतर तुम्हाला Driving Test साठी Appointment घ्यावी लागेल

त्यासठी तुम्हाला स्वतःला rto कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष Driving Test (Road Test) द्यावी लागेल .

त्या टेस्ट मध्ये दोन प्रकारच्या टेस्ट असतात

  1. 8 आकाराची टेस्ट
  2. आणि S ट्रॅकवर टेस्ट होते

या दोन्ही टेस्ट उत्तीर्ण झाल्यानंतर तुमचे Driving Licence पोस्टाने १५ दिवसाच्या आत तुमच्या घरी येते.

नवीन Driving License काढण्यासाठी लागणारी अंदाजे फीस

जर तुम्ही लर्निंग लायसन्स साठी अर्ज करत असाल तर त्यासाठी  ₹150–200 अंदाजे फी आकारली जाऊ शकते

जर तुम्ही Permanent Driving Licence साठी अर्ज करत असाल तर अंदाजे फीस हि २०० ते ३०० + DL टेस्ट फी मध्ये  ₹300 आणि स्मार्ट कार्ड फी मध्ये 200 यवढी रक्कम आकारली जाऊ शकते.

आशा आहे तुम्हाला सर्व माहिती समजली असेल जर तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाईट वर जाऊन माहिती पाहू शकता धन्यवाद.

 

Leave a Comment