फार्मर आय डी म्हणजे काय? फार्मर आय डी कशी काढावी या बद्दल संपूर्ण माहिती | About Farmer id a To z Information

नमस्कार मित्रानो आज आपण या पोस्ट मध्ये काही महत्वाचा जो टोपिक आहे to म्हणजे फार्मर आय डी या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत .

Social Buttons

सर्वात आगोदर आपण फार्मर आय डी म्हणजे काय या बद्दल सविस्तर माहिती घेऊयात.

जो शेतकरी शेतात काम करतो त्याची सर्व माहिती आता केंद्र सरकार ने online स्वरुपात म्हणजेच डिजिटल स्वरुपात जतन करून ठेवण्यास सुरवात केली आहे म्हणजे शेत्कार्यचे सर्व काही लाभ एकाच ठिकाणावरून घेता येतील या उद्देशाने शेतकर्यांना केंद्र सरकार च्या सर्व योजना चा लाभ घेता येईल या हेतून एक id दिला आहे . त्याला आपण (Unique Farmer Identification Number) या नावानेही ओळखतो या मुळे प्रतेक शेतकर्याला त्याला स्वथाचा एक ओळख असलेला id मिळेल .

Farmer ID बद्दल आणखी काही सविस्तर माहिती

फार्मर आय डी हा प्रत्येक शेतकर्यासाठी स्वतंत्र काढलेला एक ओळखीचा पुरावा आहे ज्यामध्ये शेतकर्याची सर्व माहिती असेल ज्यामुळे शेतकऱ्याला सर्व योजनासाठी लाभ घेता येईल आणि यामुळे कुठलीही अडचण येणार नाही .

फार्मर id मध्ये शेकार्याची पुढील माहिती पाहायला मिळेल.

  1. सुरवातीला शेतकर्याचे स्वतःचे नाव
  2. ज्या ठिकाणी शेतकरी राहतो त्या ठिकाणाचा संपूर्ण पत्ता
  3. शेतकऱ्याच्या नावावर किती शेत जमीन आहे याची संपूर्ण माहिती
  4. त्याच बरोबर कुठल्या ठिकाणी किती जमीन आहे आहे आणि त्या जमिनीचे शेत्र्फाल किती आहे याची संपूर्ण माहिती
  5. तसेच शेतकऱ्याच्या नावावर असलेली कागदपत्र हि येथे लिंक असतात
  6. सध्या शेतकऱ्याच्या शेतात कुठले pik आहे ते हि पाहायला मिलेते
  7. तसेच शेतकऱ्याच्या बँकेची असणारी माहिती
  8. त्याचबरोबर शेतकरी सध्या कुठल्या कुठल्या योजनाचा लाभ घेतो याबद्दल ची माहिती
  9. तसेच आतापर्यंत शेतकर्याने खत /बियाणे यावर किती किती सुब्सिडी घेतली याबद्दलची माहिती पाहायला मिळते
  10. या सर्व माहिती मुळे सरकार ला शेतकर्याची सर्व माहिती अचूक पाने मिळण्यास मदत होते.

Farmer ID  कशासाठी आवश्यक आहे ?

जसे कि आपल्या सर्वाना माहिती आहे सध्या केंद्र सरकार आणि राज्यसरकार शेत्कार्य्च्या हितासाठी खूप चांगल्या चांगल्या आणी उपयोगी योजना राबवत आहे आणि त्या सर्व योजनाचा लाभ शेतकर्यापर्यंत वेळो वेळी पोहचवा या हेतून सरकारने हा उपक्रम सुरु केला आहे . ज्यामुळे शेतकऱ्याला थेट मदत / लाभ मिळण्यास फायदा होत असताना दिसत आहे.

पुढील काही केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आहेत त्यांचा लाभ फार्मर आय डी मुळे शेतकर्यांना  मिळतो

  • पीएम किसान योजना
  • पिक विमा योजना
  • खत/बियाणे सबसिडी
  • खत अनुदान
  • तसेच शेतात लागणारी  कृषी उपकरणे (ट्रॅक्टर, पंप) सबसिडी
  • तसेच बँक शेतकरी कर्ज (KCC)

या सारख्या सर्व योजना फार्मर id सोबत सरकार ने लिंक केल्या आहेत .

Farmer ID कसा काढावा

तुम्हाला फार्मर id घरी बसल्या काढता येईल किवा जर तुम्हाला online शेत्राचे दयन नसेल तर तुम्ही तुमच्या गावातील csc सेंटर मध्ये जाऊन फार्मर id काढू शकता तर चला तर मग पाहूयात घरी बसल्या फार्मर id कसा काढायचा

ते पाहण्याआगोदर आपल्याला या साठी कुठली कागदपत्र लागतात या बद्दल माहिती पाहूयात.

Farmer ID काढण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे लागतात?

  • शेतकर्याचे स्वतःचे आधार कार्ड
  • तसेच त्या आधार कार्ड सोबत तुमचा mobile number लिंक असणे आवश्यक आहे.
  • जर स्वतःच्या नावावर शेती असेल तरच फार्मर id काढता येतो
  • तुमच्या नाववर शेती असलेली ७/१२ उतारा
  • ८-A जर फेरफार (जर असेल तर)
  • स्वतःचे बँक पासबुक किवा खाते क्रमाक आणि ifsc कोड
  • तसेच तुमच्या पिकाची सर्व माहिती असणे आवश्यक आहे.

Farmer ID Online पद्धतीने कसा काढावा? (Step-by-Step)

  • सर्वात आगोदर तुम्हाला महाडीबीटी च्या पुढील पोर्टल वर जायचे आहे. 👉 https://mahadbt.maharashtra.gov.in
  • जर तुम्हाला हे पोर्टल open नसेल होत तर तुम्ही Google वर Search करू शकता : Mahadbt Farmer Registration
  • तिकडे तुम्हाला सुरवातीची वेबसाईट येईल तिला open करून घ्याच्यचे आहे.
  • वेबसाईट open झाल्यानातर New Applicant Registration”  हा जो पर्याय दिसत आहे तिकडे क्लिक करा
  • तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर आणि ईमेल टाका
  • तुमच्या mobile वर आणि इमेल वर एक otp पाठवला जाईल to टाकून OTP Verify करा
  • ते झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड ची पडताळणी करावी लागेल ते कशे करायचे ते सांगतो
  • तिकडे तुमचा आधार number टाका
  • तुम्ही तुमच्या आधार ची पडताळणी दोन प्रकारे करू शकता
  • एक आहे ती म्हणजे तुमच्या आधार्सोबत असणार्या mobile number वर otp नुसार आणि
  • दुसरी म्हणजे तुमचे बायोमेट्रिक वापरून
  • तुम्हाला जी पण पद्धत योग्य वाटेल त्या नुसार आधार पडताळणी करा

तुमच्या आधार कार्ड ची पडताळणी झाल्या नंतर तुम्हाला एक Farmer Profile तयार करावी लागेल ज्यामध्ये तुम्हाला काही महत्वाची आवश्यक माहिती भरावी लागेल

ज्यामध्ये तुम्हाला :

  • स्वतःचे संपूर्ण नाव
  • तुमचा जिल्हा तालुका आणि गाव
  • तुम्ही राहत असलेला सर्व डिटेल मध्ये पत्ता
  • शेतीचा जर तुमच्या नावावर असेल किवा भाडेपट्टीवर आहे या संधर्भात माहिती भरावी लागेल
  • त्याच बरोबर ७/१२ उतारा माहिती
  • आणि तुमच्या बँकेची सर्व माहिती

हि माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला काही आवश्यक कागदपत्र Upload करावी लागतील

  • ती कागदपत्र पुढील प्रमाणे:
  • तुमच्या शेतीची ७/१२ उताऱ्याची स्कॅन कॉपी
  • तुमचे स्वतःचे बँक पासबुक
  • त्याच बरोबर ओळखपत्र मध्ये तुम्ही (तुम्ही आधार कार्ड किवा पॅन कार्ड देऊ शकता.

वरील सर्व माहिती भरून आणि Upload  करून झाल्यानंतर Submit हा जो पर्याय आहे त्यावर जाऊन तुमचा form submit करा

तुमच्या माहितीची आणि कागदपत्राची सर्व पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला Farmer ID Number  मिळेल.

Farmer ID Status कसा check करावा?

  1. महाडिबीटी पोर्टल उघडा

  2. लॉगिन करा

  3. Applicant Dashboard” मध्ये जा

  4. तिथे Farmer ID Valid / Verified असा Status दिसतो

Leave a Comment