Ladki Bahin Yojana New List ; मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे ज्यामध्ये करागरातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि दृढ निश्चय करण्यासाठी योजना काढलेली आहे तसेच महिला व बालविकास महामंडळ यांच्या अंतर्गत आरोग्य पोषण आणि कुटुंबातील निर्णय घेण्याची क्षमता आणि स्वतःच्या पायावरती महिलांना उभे राहण्यासाठी दिलेले प्रोत्साहन यासाठी ही योजना खूप लक्ष केंद्रित करत आहे.
लाडकी बहीण योजना २०२५ बद्दल माहिती
- लाडकी बहीण ही योजना एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली एक महत्वकांक्षी आणि यशस्वी ठरलेली योजना आहे.
- या योजनेमध्ये आतापर्यंत 40 लाखांपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेल्या असून त्यांना थेट फायदा झालेला आहे.
लाडकी बहीण योजना साठी पात्रता |
- या योजनेसाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे
- या योजनेसाठी अर्जदाराचे कमीत कमी व 21 वर्षे किंवा जास्तीत जास्त वर्ष 65 असावे 65 पेक्षा जास्त वय असेल तर अर्जदार पात्र ठरणार नाही.
- अर्जदार हा विवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटीत किंवा परितक्त किंवा निराधार महिला असू शकते कुटुंबातील एकच महिला यामध्ये ती अविवाहित असेल तेच या गोष्टी योजनेचा लाभ घेऊ शकते
- ज्या अर्जदाराला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत मध्ये असावे.
- लक्षात ठेवा खोटी माहिती देऊ नका जर तुम्ही पॅन कार्ड दिले असेल तर तुमचे पॅन कार्ड वरून वार्षिक उत्पन्न किती आहे याची माहिती सरकार घेऊ शकते त्याच्यामुळे तुम्ही जे खरे कागदपत्रे आहेत तेच कागदपत्रे द्या ही महत्त्वाची विनंती.
- लाडकी बहीण योजना यासाठी अर्ज करत असताना अर्जदार हा सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा खासदार किंवा आमदार किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनेचा याच्या अगोदर लाभ घेतलेला नसावा जर लाभ घेत असेल तर येतो यासाठी अपात्र ठरेल हे लक्षात ठेवा.
लडकी बहीण योजना आवश्यक कागदपत्रे
- या योजनेसाठी अर्ज करत असताना अर्जदाराचे स्वतःचे आधार कार्ड असावे आणि ते त्याच्या बँक खात्यासोबत लिंक केलेले असावे.
- त्याचबरोबर अर्जदाराच्या आधार कार्ड ला त्याचा स्वतःचा मोबाईल नंबर लिंक केलेला असावा आणि डीबीटी प्रणालीसाठी बँक खाते हे हे चालू असावे
- जर अर्जदाराकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर त्याच्यासाठी उत्पन्न प्रमाणपत्र हे तहसील कार्यालयातून ऑनलाईन काढलेले असावे ज्यामध्ये अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत मध्ये नोंद केलेले असावे. लक्षात ठेवा उत्पन्नाच्या प्रमाणपत्रांमध्ये तुम्ही तुमच्या हस्ताक्षराचे उत्पन्न प्रमाणपत्र चालणार नाही.
- रहिवासी प्रमाणपत्र (जर अर्जदाराकडे रहिवासी प्रमाणपत्र नसेल तर अर्जदार हा 15 वर्ष जुने रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा ओळखपत्र शाळा सोडल्यचा दाखला किंवा प्रमाणपत्र हे पुरावा म्हणून देऊ शकतो.
- विवाह प्रमाणपत्र (अर्जदाराचे विवाह झाल्याचे प्रमाणपत्र जमा करणे आवश्यक आहे ज्यामध्ये अर्जदार स्वतःचे मॅरेज सर्टिफिकेट किंवा जर रेशन कार्ड मध्ये नाव असेल तर रेशन कार्ड जमा करू शकतो लक्षात ठेवा लग्नपत्रिका यासाठी ग्राह्य धरली जाणार नाही.
मुख्यमंत्री माझ लाडकी बहीण योजना पात्र महिलांची यादी जाहीर अशी पहा गावानुसार नवीन लाडकी बहीण पात्र लिस्ट
लाडकी बहीण योजना गावानुसार यादी पाण्यासाठी खालील दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
- या योजनेच्या गावानुसार पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला खाली दिलेले ऑफिशियल वेबसाईट ओपन करावी लागेल
- व दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करून लाडकी बहीण योजना गावानुसार लाभार्थी यादी पहा या पर्यायावर क्लिक करून
- तुमचा जिल्हा निवडा
- त्यानंतर तुमचा तालुका निवडा
- त्यानंतर तुमचे गाव निवडा
- गाव निवडल्यानंतर तुमच्या गावाचे तिथे तुम्हाला यादी दिसेल ज्यामध्ये त्या यादीमध्ये तुम्ही तुमचे नाव आधार नंबर आणि बँक खाते क्रमांक तपासून घेऊ शकता.
लाडकी बहीण योजना पात्रता यादी पाण्याची दुसरी पद्धत म्हणजे महाराष्ट्र डीबीटी पोर्टल.
- होय तुम्ही आता लाडकी बहीण पात्रता यादी पुढील वेबसाईटवर ते जाऊन पाहू शकता.
Ladki Bahin Yojana list Website:- https://dbtm.Maharashtra.gov. in
- वरील वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला पेमेंट स्टेटस किंवा बेनिफिशियल लिस्ट यावर क्लिक करायचं आहे
- या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकायचा आहे.
- ही माहिती टाकल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचे नाव योजना नाव व जमा झालेले रक्कम दिसेल.
- नावाची खात्री केल्याच्या नंतरच्या महत्त्वाच्या सूचना.
- वरील दोन्हीपैकी कुठल्याही एका लिस्टमध्ये जर तुमचे नाव आढळले तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल
- जर तुमचे नाव या लिस्टमध्ये नसेल तर तुमचे अर्ज प्रलंबित किंवा अपात्र असू शकतात.
- जर तुम्हाला लाडकी बहीण योजना याबद्दल काही अतिरिक्त शंका असेल तर तुम्ही ग्रामपंचायत किंवा तुमच्या अंगणवाडी सेविका किंवा महिला व बालविकास कार्यालयांमध्ये जाऊन संपर्क करू शकता.
लाडकी बहीण नवीन अर्ज करण्याची प्रक्रिया.
लाडकी बहीण योजना यासाठी नवीन अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे फीस किंवा रक्कम देण्याचे आवश्यकता नाही ही प्रक्रिया संपूर्ण विनामूल्य आहे तसेच अर्जदार हा त्याच्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन किंवा वार्डात जाऊन किंवा अंगणवाडी सेविकाकाच्या जवळ जाऊन तो अर्ज करू शकतो.
लाडकी बहीण योजना अपात्र व्यक्तींची यादी.
या योजनेमध्ये पुढील गोष्टी जर असतील तर ते लोक अपात्र होऊ शकतात.
सरकारी कर्मचारी किंवा पेन्शन धारक:
- जर तुम्ही त्याच्या अगोदर कुठले सरकारी क्षेत्रामध्ये काम करत असाल किंवा कर्मचारी असाल किंवा तुम्हाला सरकारी काही पेन्शन मिळत असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजेच तुम्ही या योजनेतून अपात्र व्हाल.
जास्त उत्पन्न गट:
- ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहेत त्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही म्हणजेच तुमचे पॅन कार्ड वरून जर उत्पन्न ट्रॅक झाले तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
लोकप्रतिनिधी:
- जर तुम्ही आमदार किंवा खासदार असाल किंवा या कुटुंबातील असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही तसेच तुम्ही गावातील कुठल्या सरपंच किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमधून जरी निवडून आला असाल किंवा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असाल किंवा नगरसेवक असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
पूर्वी योजनेचा लाभ घेत असाल तर:
- तुम्ही याच्यापूर्वी सरकारच्या कुठल्याही एका योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजना मधून वगळण्यात येईल म्हणजेच तुम्हाला या गोष्टीचा लाभ मिळणार नाही.
अविवाहित महिला आणि विवाहित महिला बद्दल माहिती;
- जर तुमच्या कुटुंबामध्ये तीन विवाहित महिला असतील तर तुमच्या कुटुंबांमधील कुठलेही एका महिलांना या योजनेचा लाभ मिळेल तसेच तुमच्या कुटुंबामध्ये जर दोन विवाहित महिला असतील तर त्यातील फक्त एका महिलेला या योजनेचा लाभ मिळेल.
उच्च उत्पन्न गटातील व्यावसायिक किंवा नोकरदार वर्ग
जर तुमच्या कुटुंबामध्ये डॉक्टर वकील सीए किंवा मोठ्या मोठ्या पदवीचे असेल आणि ते नोकरीला असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही
वाहना बद्दल माहिती
- जर तुमच्या कुटुंबामध्ये काही चार चाकी वाहन तुमच्या नावावरती असेल तर तुम्हाला लाडकी लाडकी बहीण योजने मधून वगळण्यात येईल.
वरील कुठल्याही एका लिस्टमध्ये जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही म्हणजेच तुम्ही याबद्दल अपात्र असाल त्यासाठी तुम्हाला अपात्र फेर अर्ज हे करता येणार नाही हे लक्षात ठेवा. जर तुम्ही फिर तपासणी अर्ज केला तर तो नाकारण्यात येईल.
अशी होती ही महा महाराष्ट्र मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अपात्रता यादी बद्दल माहिती याबद्दल जर तुम्हाला काही आणखी माहिती आम्हाला द्यायची असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून आणखी माहिती देऊ शकता
धन्यवाद