PM Kisan Yojana New Update : नमस्कार मित्रानो आज आपण येथे pm किसान योजना २०२५ बद्दल सर्व सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला या योजनेबद्दल माहिती, तसेच योजनेची वैशिस्ते आणि योजनेसाठी लागणारी पात्रता , कुठली कागदपत्र लागतात,या योजनेचा लाभ कसा मिळतो आणि कोणाला लाभ घेता येतो आणि किती लाभ मिळतो , आणि अर्ज कसा करावा या बद्दल सविस्तर माहिती या पोस्ट मध्ये घेणार आहोत .
PM Kisan Yojana प्रस्तावना
हि जी योजना आहे ती केंद्र सरकार द्वारे शेतकरी साठी राबवली जाते त्याच बरोबर या योजनेंतर्गत शेतकार्यांना काही आर्थिक साहाय्य केले जाते या योजनेंतर्गत शेतकर्यांना वर्षाकाठी ऐकून ६ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.
🌾 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2025 (PM Kisan Yojana 2025) या योजनेचा उद्देश
- या योजनेचा पहिला महत्वाचा उद्देश म्हणजे लहान शेतकर्यांना त्याच्या शेतीसाठी काही आर्थिक हातभार लागावा म्हणून हि योजना सुरु केली आहे.
- तसेच शेतकऱ्याला शेतीसाठी जे बी बियाणे तसेच खत लागते त्याच बरोबर शेतीसाठी जी मशागत केली जाते त्यासाठी जो खर्च लागतो त्यासाठी मदत दिली जाते.
- या मुळे शेतकऱ्याला त्याचा आर्थिक ताण कमी होतो आणि त्याला शेतीकामात उत्तपन वाढवणे आणि स्वतः आत्मनिर्भर बनवण्यास या योजनेचा खूप महत्वाचा फायदा होत असताना दिसत आहे.
💰PM Kisan Yojana या योजनेच्या लाभाचे वितरण कशाप्रकारे केले जाते. (Benefits)
- शेतकऱ्याला प्रतेक वर्षाला ऐकून ६ हजार रुपये एवढी रक्कम त्यांच्या बँक खात्यात dbt प्रणाली द्वारे जमा केली जाते
- हि रक्कम ऐकून तीन हप्त्यामध्ये जमा केली जाते हप्त्याचे वितरण पुढील प्रमाणे आहे.
- पहिला हप्ता हा २ हजार रुपये एवढा जमा केला जातो
- दुसरा हप्ता पण २ हजार एवढा जमा केला जातो
- आणि तिसरा हप्ता पण दोन हजार रुपये जमा केला जातो
- वरील सर्व रक्कम सरकारच्या DBT (Direct Benefit Transfer) या प्रणाली द्वारे जमा करून दिली जाते त्यामुळे शेतकऱ्याला रक्कम स्वतःच्या बँक खात्यात जमा करून दिली जाते.
👨🌾 PM Kisan Yojana या योजेनेसाठी लागणारी पात्रता (Eligibility)
- जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्याचा असेल तर या योजनेच्या काही अट आणि पात्रता मध्ये तुम्हाला बसने आवश्यक आहे त्या अट आणि पात्रता पुढील प्रमाणे दिलेल्या आहेत.
- सर्वात आगोदर अर्जदार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे
- शेतकर्याकडे स्वतःचे नावावर काही शेती असणे आवश्यक आहे
- जी शेती आहे ती ७/१२ वर आणि ८अ वर नोंद केलेली असावी
- जे लहान शेतकरी आहेत त्यांच्य्साठी कमीत कमी २ हेक्टर पर्यंत जमीन आहे असे शेतकरी या योजनेसाठी पत्र असतील
🚫 PM Kisan Yojana या योजनेचा लाभ कुठल्या शेतकऱ्याला घेता येणार नाही अपात्र शेतकरी (Not Eligible)
- जे शेतकरी हे सरकारी कर्मचारी आहेत / निवृत्त आहेत यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही
- जे अर्जदार आयकर भारतात त्यांना याचा लाभ घेता येणार नाही
- तसेच ज्यांच्या नावावर १० एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही
- तसेच शेवटची अट म्हणजे जे नगरसेवक आहे, आमदार आहे खासदार किवा मंत्री आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही
📄PM Kisan Yojana या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- जर तुम्ही वरील सर्व अट साठी पात्र असाल तर तुमच्या जवळ खालील कागदपत्र असणे आवश्यक आहेत .
- ज्यामध्ये अर्जदाराचे स्वतःचे आधार कार्ड
- अर्जदाराचे स्वतःचे बँकचे पासबुक तेही IFSC कोड सहित
- स्वतःच्या नावावर जमीन असलेला ७/१२ किवा ८ अ किवा स्वतःच्या नावावर जमीन असेलेला पुरावा.
- तसेच अर्ज करण्यसाठी तुमचा स्वतःचा मोबाईल number
- आणि अर्जदाराचा स्वतःचा फोटो
- एवढी कागदपत्र लागतील.
📝 PM Kisan Yojana या योजनेसाठी अर्ज कसा करावा अर्ज प्रक्रिया (How to Apply PM Kisan Yojana)
या योजनेसाठी तुम्हाला दोन प्रकारे अर्ज करता येतो पहिला आहे online आणि दुसरा आहे offline सर्वात आगोदर आपण online अर्ज कसा करायचा या बद्दल माहिती पाहूयात.
या योजनेसाठी तुम्हाला online अर्ज प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे.
सर्वात आगोदर तुम्हाला pm किसान च्या ओफ्फिशियाल वेबसाईट वर जायचे आहे अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in
- “New Farmer Registration” जो पर्याय दिसत आहे तिथे क्लिक करायचे आहे .
- सर्वात आगोदर तुम्हाला राज्य निवडायचे आहे त्यानंतर तुमचे जिल्हा निवडा त्या नंतर तुमचा तालुका आणि नंतर गाव निवडा
- ते झाल्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा आधार number आणि जी पण माहिती आहे ती भरून घ्यायची आहे
- तुमच्या बँकेचा तपशील भरावा लागेल
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला अर्ज submit करायचा आहे.
तुम्ही अर्ज submit केला कि तुम्हाला एक “PM-Kisan Registration ID” मिळेल to तुम्हाला जपून ठेवावा लागेल . त्याचा उपयोग करून तुमची तुमच्या अर्जाचे स्टेट्स online पाहू शकता.
🔎 PM Kisan Yojana या साठी अर्ज केला तर अर्जाची स्थिती कशी पहावी/अर्जाची स्थिती तपासा (Check Application Status PM Kisan Yojana)
- pm किसान ची जी वेबसाईट आहे https://pmkisan.gov.in या वर तुम्हाला याईचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला “Beneficiary Status” हा जो पर्याय दिसत आहे त्यवर क्लिक करायचे आहे.
- तुमचा जो आधार number असेल to तिकडे टाकायचा आहेआणि तुम्ही अर्ज भरत असताना जो मोबाईल number टाकला होता तो तिकडे टाका.
- त्यानंतर तुमचा अर्ज मंजूर झाला का नाही ते तपासा .
तुमच्या अर्जाचे स्टेटस तुम्हाला online पद्धतीने पाहता येईल. त्याच बरोबर तुम्ही “PM-Kisan Registration ID” याचा उपयोग करूनही अर्जाचे स्टेट्स पाहू शकता.
⚠️PM Kisan Yojana या योजनेसंधार्बत झालेल्या काही सामन्य चुका आणि त्यसाठी कुठले उपाय आहेत ते सांगतो / कारणे आणि त्यावरील उपाय
- जर शेतकऱ्याचा pm किसान योजनेचा हप्ता थांबला असेल तर त्या शेतकर्याने सर्वात आगोदर kyc पूर्ण करणे आवश्यक आहे.
- जर तुमचा कुठलाही अर्ज नाकारला असेल तर त्याचे पुढील कारण असू शकते : तुमचे आधार कार्ड वरील नाव आणि सातबारा वरील नाव या मध्ये mismatch असू शकते त्यसाठी तुम्हाला तुम्हाला जे तुमचे जमिनीचे दस्तावेज असेल ते अपडेट करावे लागेल .
- जर तुमची रक्कम बँकेत आली नाही तर त्याचे पुढील कारण असू शकते : एकतर तुमचे बँक खाते खूप दिवसापासून बंद आहे किवा तुम्ही या योजनेसाठी नोंदणी करत असताना चुकीचा IFSC / बँक खाते number दिला असेल .त्यासाठी तुम्ही एकदा बँकेची माहिती परत एकदा online वेबसाईट वर जाऊन पाहून व्यवस्तीत अपडेट करू शकता
जर तुम्ही डुप्लिकेट अर्ज केला असेल तर तुम्हाला सर्वात आगोदर जुना केलाला अर्ज रद्द करावा लागेल त्यानंतर नवीन अर्ज मंजूर होईल .
🚜 PM Kisan Yojana लाभार्थ्यांची यादी कशी पाहावी (PM Kisan Yojana Beneficiary List)
जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल किवा तुम्ह्चा अर्ज मंजूर झाला असेल तर तुम्ही या योजनेचे गावानुसार यादी online पद्धतीने पाहू शकता.
- त्यसाठी तुम्हाला pm किसान ची online वेबसाईट आहे त्यावर जायचे आहे
- https://pmkisan.gov.in वर जा.
- गावानुसार “Beneficiary List या पर्यावर क्लिक करा
- तुमचे गाव तालुका जिल्हा आणि राज्य निवडून घ्या
या सर्व स्टेप्स झाल्यानंतर तुमच्या गावातील जे लोक लाभार्थी असतील त्याची यादी तुम्हाला पाहता येईल.
🧾PM Kisan Yojana मध्ये दुरुस्ती कशी करावी / दस्तऐवज सुधारणा कशी करावी (PM Kisan Yojana Correction)
- जर तुम्ही अर्ज भरत असताना काही चुका झाल्या तर तुम्ही online पद्धतीने त्या अपडेट करू शकता त्या अपडेट कशा करायच्या याबद्दल माहिती खाली दिली आहे
- तुम्ही पुढील गोष्टी online पद्धतीने दुरुस्त करू शकता. IFSC कोड, आधार क्रमांक
- सर्वात आगोदर तुम्हाला https://pmkisan.gov.in वर “Farmers Corner” मध्ये जा.
- “Edit Aadhaar Details” या पर्यावर क्लिक करा
- जीपन चुकीची माहिती झाली असेल ती दुरुस्त करा आणि तुमचा अर्ज submit करा.
- तुमची माहिती अपडेट केली जाईल
🔐 PM किसान योजनासाठी e kyc कशी करावी/ e-KYC प्रक्रिया (PM Kisan e-KYC प्रक्रिया 2025)
जे अर्जदार या योजनेचा लाभ घेतात किवा नवीन अर्ज केला आहे त्यसाठी केंद्र सरकार ने आता kyc बंधनकारक केली आहे जर तुमची kyc झाली नसेल तर केंद्र सरकार कडून तुमचा हप्ता थांबला जातो त्यमुळे तुम्हाला kyc करून घेणे अनिवार्य आहे.
तर आपण येथे online पद्धतीने kyc कशी करायची या बद्दल माहिती पाहणार आहोत
तुम्हाला kyc दोन प्रकारे करता येते
- पहिला मार्ग आहे तो म्हणजे तुम्हाला online पद्धतीने तुमच्या स्वतःच्या मोबाईल वरून kyc करता येईल
- आणि दुसरा मार्ग म्हणजे जवळच्या csc केंद्रात जाऊन तुम्ही kyc करू शकता
PM Kisan e-KYC Online e-KYC (स्वतःच्या मोबाईलवरून) कशी करावी?
सर्वात आगोदर तुम्हाला केंद्र सरकारच्या वेबसाईट वर जायचे आहे
pm किसान kyc वेबसाईट:- https://pmkisan.gov.in वर जा.
- ekyc जो पर्याय आहे तयार क्लिक करा
- तुमचा आधार number टाका
- तुमच्या आधार number ला जोपण तुमचा मोबाईल number असेल त्यावर एक otp येईल
- otp टाका तर तुमची kyc पूर्ण झाली असा मेसेज येईल.
CSC केंद्रावरून pm e-KYC कशी करावी?
- तुम्हाला तुमचे आधार कार्ड आणि तुमच्या आधार कार्ड सोबत जो मोबाईल आहे to घेऊन csc केंद्रात जायचे आहे
- तिकडे गेल्यानंतर तुम्ही आधार लिंकिंग आणि बायोमेट्रिकद्वारे e-KYC पूर्ण करू शकता
📞PM Kisan Yojana साठी लागणारी हेल्पलाइन नंबर (pm kissan Helpline Numbers)
जर तुम्हाला या योजनेबद्दल काही अधिकची माहिती हवी असेल तर तुम्ही खालील number वर फोन करून माहिती घेऊ शकता.
-
📱 PM Kisan Toll-Free Number: 1800-115-526
-
☎️ Helpline Number: 155261 / 011-23381092
-
📧 Email: pmkisan-ict@gov.in
-
📍 राज्य नोडल अधिकारी (Maharashtra): कृषी विभाग, महाराष्ट्र शासन
आम्हाला आशा आहे कि तुम्हाला या योजनेबद्दल सर्व माहिती समजली असेल जर तुम्हाला या योजनेबद्दल आणखी माहिती किवा अडचणी येत असतील तर तुम्ही आम्हाला comment द्वारे कळवू शकता आम्ही तुम्हाला नक्की उत्तर देऊ.
धन्यवाद.