Pradhan Mantri Awas Yojana 2025 :- नमस्कार मित्रांनो पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आत्ताच नवीन घोषणा केल्याप्रमाणे सर्वांसाठी मोफत घरे म्हणजेच घरकुल योजना ज्यामध्ये पंतप्रधान आवास योजना सुरू करण्यात आलेले आहे या योजनेद्वारे प्रत्येकाला आपल्या स्वप्नातील घर आणि आर्थिक ताण कमी करून स्वस्तात घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केलेली आहे
या योजनेमध्ये ज्याचे आर्थिक उत्पन्न कमी आहे आणि आर्थिक दुर्बल आहेत अशा लोकांसाठी परवडणारे घरे देण्यासाठी आर्थिक मदत केले जाते या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज आणि लागणारी कागदपत्रे आणि अटी कुठले आहेत याबद्दल सविस्तर माहिती आपण आज या पोस्टमध्ये पाहणार आहोत
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी असणारी पात्रता
सर्वात महत्त्वाची पात्रता म्हणजे उत्पन्न गट
- ज्या व्यक्तीचे कुटुंबिक उत्पन्न तीन लाखापर्यंत आहे अशा व्यक्ती ई डब्ल्यू एस अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र आहेत.
- एलआयस म्हणजेच निम्न उत्पन्न गट अंतर्गत असणारे पात्रता
- या उत्पन्न गटात ज्याचे उत्पन्न कमीत कमी तीन लाख ते सहा लाखापर्यंत आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
- मध्यम उत्पन्न गट यामध्ये ज्याचे उत्पन्न सहा लाख ते अठरा लाखापर्यंत आहे यांना सबसिडीचा लाभ सध्या बंद करण्यात आलेला आहे.
- अर्जदाराचे किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर भारतात कोठेही घर नसावे तरच ते या योजनेसाठी पात्र असतील.
- अर्जदाराने यापूर्वी कुठल्याही ग्रह योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
ऑनलाइन अर्ज कसा करावा
- या योजनेसाठी सर्वात अगोदर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाइन अर्ज करत असताना तुम्हाला या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला म्हणजेच पी एम ए वाय एम आय एस डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटला भेट द्यायची आहे.
- या वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला तिकडे श्रेणी निवडायचे आहे ज्यामध्ये नागरिक मूल्यांकन म्हणजेच इंग्रजीमध्ये सिटीजन असेसमेंट पर्याय अंतर्गत झोपडवासी किंवा इतर तीन खालील घटकांकरिता लाभ घ्यावा यातील कुठलीही एक श्रेणी निवडावी लागेल.
- श्रेणी निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आधार नंबरचे पडताळणी करावी लागेल आणि व्हेरिफाय करावे लागेल.
- जी माहिती महत्त्वाची आहे ती तुम्हाला माहिती भरावी लागेल ज्यामध्ये आधार अर्जामध्ये विचारलेले वैयक्तिक माहिती कुटुंबिक माहिती आणि आर्थिक माहिती अचूकपणे भरावी लागेल.
- शेवटी सबमिट या बटन क्लिक करून तुम्हाला तुमची माहिती सबमिट करायचे आहे.
ऑफलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा.
- जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येत नसेल तर तुम्ही कॉमन सर्विसेस सेंटर म्हणजेच सीएससी अंतर्गत ही अर्ज करू शकता त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या कोणत्याही सीएससी सेंटरला जाऊन तेथे 25 रुपये प्लस अतिरिक्त जीएसटी शुल्क भरून अर्ज फॉर्म भरून घेऊ शकता
- दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन गृहनिर्माण मंत्रालयाने काही बँका किंवा पोस्ट ऑफिस यांना देखील अर्ज करण्यासाठी अधिकार दिलेले आहेत त्यांना जाऊन तुम्ही बोलू शकता.
योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- सर्वात अगोदर अर्जदाराचे ओळखपत्र
- ओळखपत्र मध्य तुम्ही तुमच्या स्वतःचे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा पासपोर्ट देऊ शकता.
- उत्पन्नाचा पुरावा म्हणून तुम्ही ज्यामध्ये वेतन स्लिप फॉर्म 16 बँकचे स्टेटमेंट किंवा उत्पन्न प्रमाणपत्र यातील कुठलेही एक डॉक्युमेंट देऊ शकता.
- पत्त्याचा पुरावा म्हणून तुम्ही पुढीलपैकी कुठलेही एक डॉक्युमेंट देऊ शकता ज्यामध्ये तुमचे आधार कार्ड असेल विज बिल असेल किंवा पाणी बिल असेल यापैकी कुठलेही एक डॉक्युमेंट द्या.
- जातीचा पुरावा साठी तुम्ही पुढीलपैकी कुठलेही एक डॉक्युमेंट देऊ शकता
- यामध्ये जात प्रमाणपत्रा जसे की एस सी, एसटी, किंवा ओबीसी असल्यास जात प्रमाणपत्र द्यावे लागेल.
- इतर गोष्टींमध्ये तुम्हाला तुमच्या घराचा बांधकाम आराखडा मालमत्तेचे मूल्यांकन असणारे प्रमाणपत्र जर लागू असेल तर द्यावे लागेल.
यासाठी अर्ज केल्यानंतर अर्जाची स्थिती कशी पहावी
- प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या अर्जाचे स्टेटस ऑनलाइन पद्धतीने पाहता येईल.
- ज्यामध्ये तुम्हाला मूल्यांकन आयडी आयडी द्वारे स्टेटस पाहता येईल
- त्यासाठी तुम्हाला पी एम ए वाय एम आय एस या पोर्टल वरती जाऊन स्थिती तपासा हा पर्याय निवडून तुमचा मूल्यांकन आयडी आणि तुमचा मोबाईल नंबर टाकून स्थिती पाहता येईल.
- त्याच्यानंतर तुम्हाला नाव आणि मोबाईल नंबर टाकूनही त्यामध्ये तुम्हाला तुमचे स्वतःचे नाव टाकायचे आहे वडिलांचे नाव टाकायचे आहे आणि नोंदणी करत मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करून तुम्ही त्याचे स्टेटस पाहू शकता.
- प्रधानमंत्री आवास योजनेबद्दल इतर काही महत्त्वाची माहिती खालील प्रमाणे.
प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे काय.
- शहरामध्ये राहणारे आणि ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी केंद्र सरकारची ही एक योजना आहे ज्यामध्ये सर्वांना परवडणारे घर उपलब्ध करून देणे आणि त्यांचा आर्थिक भार कमी करून देणे यासाठी ही योजना काढण्यात आलेली आहे.
या योजनेची वैशिष्ट्ये
- या योजनेचे 2022 पासून 2025 पर्यंत सर्वांना स्वतःची हक्काचे घर मिळावे हे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट आहे
- या योजनेमध्ये जास्तीत जास्त लाभ लोकांनी लाभ घ्यावा हे योजनेचे खूप महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
अनुदान विभागणी
- जे लोक शहरी भागांमध्ये राहतात त्यांना ग्रह खरेदी किंवा बांधणीसाठी या योजनेअंतर्गत अडीच लाखापर्यंत या योजनेचे अनुदान दिले जाते.
- ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी नवीन घर बांधण्यासाठी कमीत कमी एक लाख वीस हजार ते एक लाख 80 हजार पर्यंत या योजनेअंतर्गत मदत दिली जाते
- तसेच या योजनेमध्ये जर बँक कर्ज घेतलेले असेल तर बँक कर्ज मध्ये 6.5% पर्यंत सबसिडी दिले जाते
- सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेचे पैसे हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर नुसार डायरेक्ट वापरतेच्या खात्यात जमा केल्य जातात.
अशाप्रकारे ही योजना होती.